Ads

राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्येचा भद्रावती तालुका अधिवक्ता संघातर्फे निषेध.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती :-अहमदनगर जिल्ह्यातील राजुरी तालुक्यातील ऍडवोकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी एडवोकेट मनीषा आढाव या वकील दांपत्याची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सीआयडी यंत्रणेकडे द्यावा व वकिलांच्या सुरक्षिततेसाठी एडवोकेट प्रोटेक्शन अक्टची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन भद्रावती तालुका अधिवक्ता संघाद्वारे दिनांक 31 रोध बुधवारला सकाळी 11 वाजता येतील तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी एक सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
Bhadravati Taluka Advocates Association protested the murder of a lawyer couple in Rahuri.
सध्या वकिलांवर हल्ले व खोट्या केसेस करण्याचे प्रमाण राज्यात वाढले असल्यामुळे कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एडवोकेट प्रोटेक्शन अक्ट त्वरित लागू करावा अशी मागणी अधिवक्ता संघाद्वारे करण्यात आली. यावेळी सदर प्रोटेक्शन अक्ट अद्यापही लागू करण्यात न आल्याने राज्य सरकारचाही निषेध करण्यात आला. सदर वकील दांपत्याची निर्घुण हत्या हा गांभीर्याचा विषय असल्याचे निवेदनातून म्हटले गेले. निवेदन सादर करताना भद्रावती तालुका अधिवक्ता संघाचे पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment