चंद्रपुर :-आज सकाळी कोळसा वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र संगम, उपक्षेत्र झरी कक्ष क्र. 338 पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षकास गस्ती दरम्यान दोन वाघांचे मृतदेह आढळुन आले.
Two tigers died in a tiger fight in Kolsa forest area
एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुस-या वाघाने अंशता मांस भंक्षण केलेले दिसले. पूर्णपणे शाबुत असलेला वाघ हा T-142 नर असुन अदाजे वय 6- 7 वर्षे आहे. कमी वयाचा दुसरा वाघ हा T-92 या वाघीणीचा मादी बच्चा आहे, अंदाजे वय 2 वर्षे आहे. दिनांक 20/01/2024 ते दिनांक 21/01/2024 चे रात्री झालेल्या वाघाच्या झुंजीत सदरील दोन वाघांचा मृत्यु झाल्याचा कयास आहे. परिसराची कॅमेरा ट्रॅपच्या द्वारे अधीक माहिती गोळा करण्यात येत आहे.

वाघाचे मृतदेह TTC चंद्रपुर येथे पाठविले आहे. दिनांक 23/01/2024 रोजी सकाळी TTC चंद्रपुर शवविच्छेदना दरम्यान मृत्युचे नेमके कारण काय त्यांचा अंदाज येईन. नमुने DNA चाचणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.
मौका पंचनामा करते वेळी श्री. नंदकिशोर काळे उपसंचालक (कोर), वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), कोळसा श्री. रुदंन कातकर व श्री. बंडु धोतरे, NTCA प्रतिनिधी व WPSI चे श्री. मुकेश बांधककर, वन्यजीव संशोधक श्री. क्रीष्णन WII, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी श्री. खोब्रागडे व जीवशास्त्रज्ञ श्री. यशस्वी राव व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment