Ads

माळी समाज बहुउद्देशीय संस्था घाटंजी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती सोहळा संपन्न

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) :-
दि 03 जानेवारी 2024 ला महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व संस्कृतिक सभागृह नियोजित जागेवर क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती चा सोहळा संपन्न झाला.
Kranti Jyoti Savitrimai Jyotiba Phule Jayanti Ceremony was held on behalf of Mali Samaj Multipurpose Organization Ghatji.
सदर कार्यक्रम चे अध्यक्ष स्थान सौ कल्पना शंकर काकडे (सरपंच, खापरी )यांनी भूषविले. कार्यक्रम ला प्रमुख अतिथी श्री देवकुमार शेंडे (उपसरपंच, खापरी ), सौ शीतल कळस्कर, विजय पाटणकर, संजय खडके, महेश कळस्कर, रा. वी. नगराळे, राम खांडरे सौ मंगलाताई कटकोजवर, रामभाऊजी किरणापुरे, मोरेश्वरराव पेटकुले, हे होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मंडळी यांनी सावित्री माई यांचे प्रतिमेचे पूजन केले. सदर कार्यक्रम मध्ये सन 2022-2023 मध्ये इयत्ता 10 वी व 12वी मधील 60% च्या वर उत्तीर्ण विध्यार्थी यांचे शिल्ड व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रम मध्ये अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी आपले विचार व्यक्त केले. सौ पूजा राऊत (व्हाईस प्रि्सिपल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ )यांनी व्याख्यान पर भाषण केले. कार्यक्रम मध्ये, सौ अस्मिता दानव (चंद्रपूर ) हिने काढललेली सावित्रीमाई चे रांगोळी चित्र विशेष आकर्षण ठरले. सदर कार्यक्रम चे संचलन अनिल वाढोणकर, प्रास्ताविक राजू उपरीकर आभार प्रदर्शन मोहन शेंडे यांनी केले. कार्यक्रम चे यशस्वीते साठी ज्ञानेश्वर लांजेवार विष्णू सोनुले, धनंजय बंगले शंकर लेनगुरे, दिनेश मोहुर्ले भास्कर मोहुर्ले, दिलीप महाजन पांडुरंग किरनापुरे, प्रमानंद पेटकुले, दिनेश गाऊत्रे यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment