Ads

सायतखर्डा येथील बेमुदत धरणे आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित

घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथे गेल्या सहा महिन्यापासून पाणीपुरवठा योजनेच्या नळाचे पाणी रस्त्यावर येऊन सखल भागामध्ये साचल्याने रस्ता वरून पायदळ चालताना सुद्धा महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्याने रोगराई सुद्धा उद्भवण्याची दाट शक्यता आहे, यावर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक निर्बंध लावावे याकरिता घरगुती नळ धारकाच्या नळाला तोटी नसल्याने स्वतःचे पाणी झाल्यावर अतिरिक्त पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे, या पाण्याचा बंदोबस्त करा, या मागणीला घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे ग्राम शाखा अध्यक्ष कपिल चौधरी यांच्या नेतृत्वात नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर एक जानेवारीला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते,
The sit-in protest at Saitkharda suspended after written assurance

आंदोलन स्थळी ग्रामपंचायत चे सरपंच कैलास मुनेश्वर व सचिव बोडाले साहेब यांच्या लेखी आश्वासनाने सदर बेमुद धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे, जिल्हा वस्तीगृह नियंत्रण समितीचे माजी सदस्य राजेश निकोडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन लेनगुरे, पोलीस पाटील प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नागरिक मधुकर चौधरी ,उत्तम वाढई, भारत गायकवाड ,मोहन मोहरले गोविंदा ठाकरे, महादेव कोटरंगे बाबाराव शेंडे, करणूजी चौधरी, भाऊराव ठाकरे व महिला भजनी मंडळाच्या प्रतिनिधी हजर होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment