Ads

सरकारची निर्यात बंदी,शेतकऱ्यांची मार्केट बंदी.

पुणे :- शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा कडाडून हल्ला करण्यासाठी, प्रमुख शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक व पत्रकार परिषद पुणे येथे झाली. दि.8 जानेवारी 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या, मार्केट बंदीची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली शेतकऱ्यांनी कोणीही शेतमाल मार्केट मध्ये विक्रीसाठी नेऊ नये. सतत गेल्या अनेक वर्षापासून राज्य व केंद्र सरकार शेतकरी विरोध विरोधी धोरण राबवीत त्याचा फटका शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनावर होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांची एकजूट होऊन बाजार बंदीचे आंदोलन पेटविले आहे.

Export ban by government, market ban by farmers.
केंद्र सरकार व राज्य सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. दि. 1 जानेवारी 2024 शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा कलेक्टर पुणे यांच्याकडे शेतकरी नेत्यांनी निवेदन दिले. त्यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. विदर्भातील शेतकरी नेते व ज्येष्ठ साहित्यिक श्री धनंजय पाटील काकडे, माणिकरावजी कदम परभणी, नाशिक नानासाहेब बच्छाव नाशिक, विठ्ठल पवार राजे इंदापूर पुणे , भानुदासराव शिंदे पुणे, कैलास खांडबहाले नाशिक, दीपकजी पगार, प्रवीण जेठेवाड नांदेड, सरफराज शेख दौंड, रवीरानपवार इंदापूर ,अनिल भांडवलकर, सुभाष करांडे पुणे इतर नेते उपस्थित होते. सरकारची निर्यात बंदी, तर शेतकऱ्यांची मार्केट बंदी. करण्यात येत असून सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन पुढील बेमुदत आंदोलन 8 जानेवारी 2024 पासून पुकारले आहे. शेतकऱ्यांनी कृषी मार्केट समितीला माल न पाठवीता, आठवडी बाजारात किंवा घरून शेतमालाची विक्री करावी . शेतकऱ्यांचा शेतमाल जागतिक बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने निर्यात बंदी उठवावी . शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघाने या आंदोलनाला पाठिंबा आहे असे श्री धनंजय पाटील काकडे यांनी जाहीर केले. तसेच पुढे ते म्हणाले- सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचा फक्त उपयोग करून घेतला व शेतमालचे उत्पादन वाढवून शहरातील जनता पोसण्यासाठी उत्पादन वाढविले. परंतु शेतीमालाचे भाव न वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंबात आत्महत्या वाढत राहिल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते सहभागी होऊन महाराष्ट्रात शेतमाल मार्केट बंद आंदोलन पुकारले आहे,असे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी नेते श्री धनंजय पाटील काकडे यांनी जाहीर केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment