घाटंजी तालुका प्रतिनिधी :-या भुतलावर असा कोणी व्यक्ती वा समाज नाही, ज्यांना समस्या नाहीत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकानांच संघर्ष करावा लागतो. त्याचप्रमाणे माना जमातीला सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र , शैक्षणिक समस्या आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र संघटन मजबूत करून सर्वांच्या सहकार्याने संघर्ष केला तर त्या अडचणी सोडवून प्रगती करणे शक्य आहे असे प्रतिपादन माना आदिम जमात मंडळ मुंबई चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. दिनेश दांडेकर यांनी केले .
नाग दिवाळी महोत्सवा मध्ये खुली एकल नृत्य स्पर्धा ,स्पर्धा परीक्षा चाचणी , चित्रकला स्पर्धा, समाजिक संदेश देणा-या रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम घेऊन आयोजक गाव विकासासाठी मोलाचे कार्य करित आहे असे त्यांनी सांगितले.आदिवासी माना जमात विद्य्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र ग्राम शाखा मांडवा च्या वतीने दि.२१ व २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य नाग दिवाळी महोत्सवाचे आयोजन मांडवा गावामध्ये करण्यात करण्यात आले होते.
नागदिवाळी महोत्सवातील गावकऱ्यांचा उत्साह हा खरच अप्रतिम असून असा एकोपा व सौख्य गावामध्ये राहिल्यास गावाचा विकास नक्कीच शक्य आहे असे मनोगत नाग दिवाळी महोत्सवामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आलेले भाजप तालुका सरचिटणीस मा.दिलीप पवार यांनी केले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. अशोकजी कनाके हे होते तर एन.टी.मेश्राम मुख्याध्यापक, के.डी.किनाके, पी.के.विरदंडे , श्रीमती सोनाली अवधूत गायकवाड, सर्वश्री.मनोहरराव भोयर, श्रीकांत घोडे ,अजबराव घरत,पांडुरंग शेंडे,सुधाकर शेंडे, विठ्ठल राऊत आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. खुल्या एकल नृत्य स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिकाचे मानकरी जय कैथवास-नागपूर व सुरज धानुस्कर अमरावती ( विभागून) ठरले तर द्वितीय पारितोषिक श्रावणी मोरे व संयुक्ता ढवळे वणी, तृतीय पारितोषिक विजेते मिताली पांडे वणी आणी चतुर्थ पारितोषिक विजेते कामाक्षी आंबुलकर व योगेश वैद्य नागपूर यांनी पटकाविली आहेत.
या कार्यक्रमासाठी गावातील सर्व संघटना,मंडळे आणी आदिवासी माना जमात विद्य्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा मांडवाच्या सर्व सदस्यानी सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment