Ads

डांगरगाव येथे नेत्रे व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
डांगरगाव ग्रामपंचायत ता.घाटंजी जि. यवतमाळ च्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर दिनांक २०/०१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले. यामध्ये डांगरगाव व परिसरातील अनेक गावातील गरजु रुग्णांनी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
Eye and health screening camp concluded at Dongargaon
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मा. संघपाल कांबळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी घाटंजी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ अधिकारी येरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.पांडुरंग निकोडे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यवतमाळ, पोलीस पाटील सोपान भाटे , तंटामुकीत अध्यक्ष उकंडराव अराडे , रा.वि. नगराळे उपस्तीत होते.
या शिबिराला डॉ.विलास मुन नेत्र चिकत्सक , डॉ. प्रशांत उपरे नेत्र चिकत्सक , डॉ. प्रशांत आडे आयुर्वेद चिकत्सक , डॉ. मयूर कांतडे दंत चित्सक , भांबोरा प्रा.आ.केंद्र येथील डॉ. रजत साखरकर आरोग्य अधिकारी व अविनाश कांकलवार आरोग्य सेवक यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करून आपली सेवा बहाल केली. मिलिंद बनसोड आदर्श मेडिकल व विमित मुन यांनी औषधी पुरवठा करण्यास सहायता केली .
नेत्र दान पवित्र दान ही संकल्पना करून डांगरगाव येथील ग्रामपंचत ने आपल्या एक वर्ष पूर्ण साठी प्रकाश खोडे सरपंच , नंदू अरडे उपसरपंच, गजानन शिरभाते सचिव , विष्णू मेश्राम सदस्य , शशिकांत शेंडे सदस्य , शारदा कुंभरे सदस्य , वर्षा भगत सदस्य , सुजाता भवरे सदस्य , प्रणाली महल्ले सदस्य , ज्योती कडू अंगणवाडी सेविका , राणी मेश्राम आशा वर्कर ह्या मंडळींनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले .
कार्यक्रमाच्या यशवितेसाठी सुरेश मारबदे , शंकर पिंपळे , पांडुरंग मेश्राम , रत्नाकर गावंडे , रामकृष्ण उमरे , ज्ञानेश्वर मेश्राम , हनुमान शिवरकर , रविना अराडे ,मनोहर महल्ले , देविदास भगत यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयंत वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मेंद्र भावरे यांनी केले .
डांगरगाव ग्रामपंचायत चा आदर्श तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे असे प्रतिपादन संघपाल कांबळे यांनी आमल्या मनोगतात मत व्यक्त केले .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment