घाटंजी :- तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी रुपेशभाऊ कल्यमवार यांची निवड करण्यात आली आहे. रुपेश भाऊ कल्यमवार हे सगदा गावचे सुपुत्र आहेत. यांची निवड काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार नाना गावंडे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन कांग्रेस कमिटी यांच्या वतीने करण्यात आली आहे रुपेश कल्यमवार यांनी आगामी काळात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करणार आहे अशी माहिती या वेळी दिली.
सर्वसामान्य कुटुंबातील रुपेश भाऊ कल्यमवार हे सर्वसामान्य गोर गरीब व शेतकरी कष्टकरी समाजासाठी व कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम केले त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे व प्रफुल्ल मानकर जिल्हा अध्यक्ष यवतमाळ कांग्रेस कमिटी युवा नेते जितेंद्र मोघे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वामीबाबू काटपेल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यात तालुक्यातुन सर्व स्थरातुन कौतुक केले जात आहे
0 comments:
Post a Comment