Ads

चंदनखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती:-भद्रावती तालुक्यातील संसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेल्या मौजा चंदन खेडा येथे मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्यात. आला. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या चंदनखेडा गावत कोणतेही शासकीय सन उत्सव मोठ्या थाटात साजरा केल्या जाते.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti was celebrated with great enthusiasm at Chandankheda
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा मौजा चंदनखेडा जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा तसेच छत्रपती मंडळाचे वतीने गावात मिरवणूक काढण्यात आली व ग्रामपंचायत कार्यालयात मूर्तीचे पूजन करून तसेच गावातील बिरसा मुंडा चौकात भगवा झेंडा सरपंच श्री. नयन जांभुळे यांचे हस्ते फडकवून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच शिवजयंती चे औचीत्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत मंजूर झालेल्या बसस्टॉप परिसर सौदर्यकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधीरभाऊ मुडेवार होते तर उद्घाटक म्हणून सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच सौ भारती उरकांडे माजी सरपंच सूमित भाऊ मुळेवार, ग्रामपंचायत सदस्य श्री बंडूजी निखाते, श्री. निकेश भागवत, श्री. नाना बगडे सौ. मुक्ता सोनुले सौ. प्रतिभा दोहतरे, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड, सौ. श्वेता भोयर, सौ. आशा नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. ईश्वर धांडे , महात्मा गांधी तंटमुक्त अध्यक्ष श्री. मनोहर हनवते पोलीस पाटील समीर खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment