Ads

आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे स्पर्धेत भद्रावती येथील चार कराटेपटूंना आठ सुवर्णपदके.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती,मुंबई येथील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आजाद नगर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शोतोकान कराटे कप स्पर्धेत भद्रावती शहरातील हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या चार कराटे पटुंनि नेत्रदीपक खेळ सादर करीत आठ सुवर्णपदके प्राप्त केले केले आहे.
Four karate players from Bhadravati won eight gold medals in International Shotokan Karate Competition.
या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारत, जपान, मलेशिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका व इटली या सहा देशातील 2500 कराटेपटूंचा सहभाग होता. सदर स्पर्धेत हुतात्मा स्मारक कराटे क्लबच्या दामिनी सूर्यवंशी हिने ओपन चॅम्पियनशिप मध्ये फाईट तथा कातास या प्रकारात दोन सुवर्णपदके, साची चावरे हिने 20 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके,साक्षी कपाट हिने 30 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके तर सोनाक्षी कोंडस्कर हिने 25 किलो वजन गटात फाईट व कातास प्रकारात दोन सुवर्णपदके प्राप्त केली. या चारही कराटे पाटुंनि आठ सुवर्णपदके प्राप्त करून या स्पर्धेत क्लबचे व भद्रावती शहराचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल चारही कराटेपटूंचे शहरात कौतुक होत असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक गुरु शियान राकेशदीप,सिंहान शितल तेलंग, मास्टर संदीप चावरे व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment