Ads

आमदार प्रतिभा धानोकर यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र..

चंद्रपुर :-सध्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडलेली दिसून येत आहे. जातीतील भांडणे संपण्याचे नाव घेत नसून त्यासोबतच ड्रग्स तस्करीने डोके वर काढले आहे. पुण्यात सापडलेल्या ड्रग्स चा कारखाना भविष्यातील पिढी बरबाद करण्याचे संकेत देत आहे.
MLA Pratibha Dhanorkar's emotional letter to Chief Minister..
महाराष्ट्रातील बेरोजगारांना एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे ड्रग्स तस्कर युवकांना व्यसनाधीन करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत शहरात ड्रग्स तस्करीचे कारखाने तयार होत असेल तर ही बाब भविष्यातील युवा पिढी करिता धोकादायक असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात वाढत चाललेले ड्रग्स तस्करांचे जाळे थांबवण्याचे मत पत्रातून व्यक्त केले आहे. भविष्यातील युवा पिढी व्यसनाधीन होणार नाही याकरिता शासनाने मोठे पाऊल उचलावे असे त्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री यांना सांगितले आहे. युवकांना व्यसनापासून रोखण्याकरिता पालकांनी देखील सतर्क राहण्याचे मत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment