Ads

रेखा गौतम भारतीय सुदर्शन समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशाध्यक्ष पदावर आणि राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर समुंद्रे यांची निवड

तालुका प्रतिनिधी जावेद शेख भद्रावती:-भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवार, ४ फेब्रुवारी रोजी भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे माजी सदस्य दिलीप हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर च्या आमदार निवास सभागृहात पार पडली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष पवनकुमार सातपुते (सुदर्शन) आणि राष्ट्रीय महामंत्री गौरीशंकर ग्रावकर यानी राष्ट्रीय महिला अध्यक्षा पार्वती तांबिया यांच्या वतीने महिला समाजसेविका सौ रेखा राजेश गौतम रा.दुर्गापूर चंद्रपूर यांची महाराष्ट्र राज्याच्या भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Rekha Gautam Bharatiya Sudarshan Samaj Federation Maharashtra Pradesh Women Regional President and the selection of Chandrasekhar Samundre for the post of National Vice-President
राष्ट्रीय कार्यकारिणीत चंद्रपूर येथील सुदर्शन समाजाचे तीन ज्येष्ठ सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली असून सुदर्शन समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यामध्ये चंद्रपूर रोहित पेट्रोलियमचे संचालक चंद्रशेखर समुंद्रे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ठक्कर कॉलनी चंद्रपूरचे राजूजी समुद्रे आणि पंचशील वार्ड चंद्रपूरचे चंदन नाहरकर यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
सौ रेखा राजेश गौतम यांची भारतीय सुदर्शन समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भारतीय सुदर्शन समाज महासंघ चंद्रपूर संघाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित बैठकीत राष्ट्रीय महिला अध्यक्षा पार्वती तांबिया, राष्ट्रीय महिला महामंत्री मीरा तांबे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष घनशाम डकहा, प्रदेश महामंत्री मनोज खोटे, संघटनमंत्री राजेश रेवते, गिरीश शुक्ला आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment