घाटंजी:-खापरी येथिल जिजाऊ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी संस्थापक स्वर्गीय सुनील सुधाकर बेलोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेत स्नेहसंमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना पंचायत समिती घाटंजीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर वांढरे यांनी "स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांना निर्मळ आनंद देणारे क्षण होय" असे मत व्यक्त केले.
वर्षभर राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या सहशालेय उपक्रमांतर्गत गुनानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाहेरगावातून आलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांचा गौरव व सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाविष्कार पाहून भरभरून कौतुक केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर वांढरे, उद्घाटक खापरी ग्रामपंचायत येथील सरपंच कल्पनाताई काकडे, उपसरपंच देवकुमार शेंडे, ग्रामसचिव कांगणे मॅडम, केंद्रप्रमुख संजय पडलवार, रवी आडे, के.डी. किनाके, चंद्रकांत मुनेश्वर, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई करमणकर, वंदना कांबळे,शुभांगी भोयर, अंकित भोयर, किरण टिपले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजय राठोड,सूत्रसंचालन प्रा.प्रशांत नमुलवार व प्रा.संजय गायकवाड तर मुख्याध्यापक प्रमोद भजगवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता महेश अडगुलवार,प्रा.सतीश येरकार, प्रा.विनोद पवार,प्रा.विठ्ठल गेडाम,संदिप निकम,शशी कांबळे,रश्मी जोशी,शिवाजी भुजाडे,अधीक्षक पी.एस.चव्हाण,सपना कुळसंगे,अधिक्षिका अनुराधा अक्केवार,संतोष राऊत,एस. डी.भोयर,पी. टी.भोयर,पंकज मिश्रा,नरेश पेंदोर,राजू पातालबंशी,विलास हिवराळे,नंदा पंधरे,प्रमिला मोहोड यांनी अथक परिश्रम घेतले.
*कोट:-* संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत बेलोरकर यांच्या मार्गदर्शनात तळागाळातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.
----प्राचार्य, विजय राठोड
0 comments:
Post a Comment