Ads

शिवसेना(ऊबाठा) गटाचे विद्यार्थी प्रमुख स्वप्नील मोहूर्ले वर चाकूने प्राणघातक हल्ला

राजुरा 26 फेब्रुवारी :-राजुरा शहरात गुन्हेगारीवृत्ती वाढत असून खुलेआम शस्त्र बाळगून जीवघेणा हल्ला करणे एक प्रकारे वाढती गुन्हेगारीकडे शहराची वाटचाल सुरू असून क्षुल्लक कारणे सुध्दा जीवघेणी ठरू लागल्याने घराच्या बाहेर पडायचे किंवा नाही आणि स्व मालकीच्या ठिकाणी आपले नियमावलीनुसार कामं करायचे की नाही असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Swapnil Mohurle, student leader of Shiv Sena (UBT) faction, attacked with a knife.
दि.25 फेब्रुवारी च्या रात्रौला अकरा वाजता च्या दरम्यान चार युवक स्वप्नील मोहूर्ले यांच्या मालकीचे पाहुणचार नामक हॉटेल मध्ये हातात दारूच्या बोटल्स घेऊन आले आणि दारू पिऊ देण्याचा अट्टहास करीत असताना स्वप्नील यांनी त्या युवकांनी अडवले. या हॉटेल मध्ये मद्य पिण्यास सक्त मनाई आहे असे स्वप्नील ने त्या चारही युवकांना सांगितले व येथे महिला, परिवारासह असल्याने मद्यसेवन करू देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून या युवकांनी धारदार चाकूने स्वप्निल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हॉटेल मधील स्वप्निल च्या अन्य सहकार्यानी पोलीस स्टेशन राजुरा येथे तात्काळ भ्रमणध्वनी ने संपर्क केला तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येत दोन आरोपीना ताब्यात घेतले तर अन्य दोन आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रितीक भास्कर लांडे(20), नीरज राजू चिडे(21) राहणार जवाहर नगर राजुरा हे आहेत. तर अन्य दोन आरोपींचा शोध राजुरा पोलिस घेत आहेत. पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, डी बी चे उप पोलिस निरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस हवालदार सुनील गौरकार, किशोर तुमराम, पोलीस शिपाई तिरुपती जाधव, संदीप बुरडकर, महेश बोलगोडवार, रामा बिगेवार हे या घटनेचा पुढील तपास करीत आहे. जखमी स्वप्नील मोहूर्ले यांना वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. स्वप्नील हा शिवसेना (ऊबाठा) गटाचा विद्यार्थी आघाडी प्रमुख असून तो स्वराज आधार फाउंडेशन चा अध्यक्ष सुद्धा आहे. नुकतेच त्यांनी पाहुणचार नावाचे हॉटेल सुरू करून स्वयंरोजगाराकडे वाटचाल केली. या हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळत असून पारीवारीक आणि अन्य लोकांचाही येथे चांगला प्रतिसाद आहे. मद्यसेवन करू न दिल्याने झालेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment