Ads

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एका आठवडयात 3 सराईत गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई

चंद्रपुर :-आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सक्रिय झाला असुन मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. रिना जनबंधू, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदशीखाली सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई ची धडक मोहिम हाती घेतली आहे.In the background of the Lok Sabha elections, action was taken against criminals in 3 Sarai in one week
आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर जिल्हात शांतता अबाधीत राखण्या करीता चंद्रपूर जिल्हयातील शरीरा विरूद्ध व मालमत्ते विरुद्धचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्या सबधाने मा.पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच पो.स्टे. चंद्रपूर शहर येथील 1) शुभम अमर समुद वय 26 वर्षे रा. पंचशील वार्ड, चंद्रपूर पो.स्टे. रामनगर येथील 2) शारुख नुरखा पठाण वय 29 वर्षे रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ, चंद्रपूर 3) नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय 31 वर्षे रा.लुंबीनी नगर बाबुपेठ वार्ड, चंद्रपूर यांना या आठवड्यामध्ये तसेच पो.स्टे. वरोरा येथील 1) मोहन केशव कुचनकर वय 25वर्षे रा.चिरघर लेआऊट वरोरा जि. चंद्रपूर यास मागील आठवडया मध्ये कलम 56 (1) (अ) (ब) म.पो.का. अन्वये चालु महिण्यात असे एकूण 4 इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपूर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक, रिना जनबंधु मॅडम यांचे मार्गदर्शनात मा. नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, मा. सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोलाची कामगीरी बजावून आतापर्यंत नमुद इसमांना 6 महिण्या करीता चंद्रपूर जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment