भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-भद्रावती समोर जात असलेल्या ट्रेलर ट्रकला त्याच दिशेने मागून जात असलेल्या कारची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 22 रोज शुक्रवारला रात्रो दहा वाजता चंद्रपूर -नागपूर हायवेवरील कोंढा फाट्याजवळ घडली.
अभिजीत गिरीधर थिपे वय 28 वर्षे, राहणार मंजुषा लेआउट, भद्रावती असे या मृतक युवकाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार सदर युवक हा एमएच ३४ ए एम 22 37 या क्रमांकाच्या कारणे एकटाच वरोऱ्याकडे जात होता. समोर जात असलेला एमएच ४६ बीएफ ३८ ४९ या क्रमांकाचा ट्रेलर ट्रक यु टर्न घेत असताना मागून जात असलेली ही कार ट्रेलरच्या मागच्या भागाला आदळली. जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाला उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असतात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment