भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख):-भद्रावती येथील राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर जिल्हा ऊपाध्यक्ष तथा भद्रावती येथील फेरीलैंड स्कुलचे संचालक अड.युवराज धानोरकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
Entry of NCP sub-district president Ad. Yuvraj Dhanorkar into Shiv Sena (Shinde group).
मुंबई,वरळी येथील एनएससिआय सभागृहात पक्षाच्या दिनांक २१रोज गुरुवारला आयोजित आढावा बैठकीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी पक्षाचे सचिव संजय मोरे ,वन व आपत्ति पुनर्वसन मंत्री संजय राठोड,पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव,जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय पईतवार,राज्य कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व बंडू हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. युवराज धानोरकर यांच्या या पक्षप्रवेशामुळ जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबुत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.पक्षप्रवेश केल्यामुळे युवराज धानोरकर यांचे जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
0 comments:
Post a Comment