Ads

महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा दौऱ्यात विविध कार्यक्रमात मार्गदर्शन

चंद्रपूर:-जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे आयोजित मानवतावादी मित्र मिलन व राष्ट्रचिंतन या दोन दिवसीय शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष मा.अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
Maharashtra ANNIS state president Avinash Patil guided in various programs during his visit to Chandrapur and Gadchiroli districts.
त्यानंतर ऊर्जानगर वसाहत जि. चंद्रपूर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सभागृहात आयोजित ऊर्जानगर शाखेच्या बैठकीत अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत महा अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी .एम. जाधव,नारायण चव्हाण जिल्हा प्रधान सचिव, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे, ऊर्जानगर शाखेचे कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, प्रधान सचिव बाळकृष्ण सोमलकर,शंकर दरेकर उपाध्यक्ष,संजय जुनारे,सुरेंद्र इंगळे,किसन अरदळे व पदाधिकारी व श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे,मारोती पिदूरकर, हरीचंद्र देवतळे व पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मातोश्री विद्यालयात आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देवून अविनाश पाटील यांनी सत्कार केला. याप्रसंगी गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी माजी प्राचार्य तथा महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खनके यांचे हस्ते मा.अविनाश पाटील यांचा शाल व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पी एम जाधव, प्रदीप हिवाळे, प्राचार्य बिजवे. मुख्याध्यापक बसुने, प्राचार्य कल्याणी बावणे, शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच चंद्रपूर दौऱ्यानंतर त्यांचा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करण्यात आला यात डाँ. अभय बंग सर्च संस्था, डाँ.शिवनाथ कुंभारे जिल्हाध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ,महा अंनिस शाखा भेटी तसेच विविध सामाजिक संस्था भेटी घेण्यात आल्या असे देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस ऊर्जानगर यांनी कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment