घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
लाईनमन हा दिवस घाटंजी येथे सोनू मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त घाटंजी शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. क्रिकेटचे सामने, कॅरम, बॅडमिंटन, चेस्ट असे अनेक खेळ खेळले गेले. लाईनमन लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.Celebrating Lineman's Day at Ghatji
तसेच सेवानिवृत्त लाईनमन ज्यांनी तीस वर्षाच्या वर वीज कंपनी सेवा दिली असे पेटेवार, पुरके, एकुनकर, पठाण, शेख, पेंदाम, दीक्षित, मैंद, सोनुले अशा सर्व लाईनमन यांना शाल श्रीफळ देऊन देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोळंबी वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता मलोडे साहेब, घाटंजी येथील उपकार्यकारी अभियंता कुऱ्हा साहेब, उपविभागाचे बावनकर मॅडम, भांगे मॅडम, घाटंजी शहर चे कनाके साहेब घाटंजी ग्रामीण चे नाईक साहेब, मौहदा वितरण केंद्राचे देसाई साहेब, पारवा वितरण केंद्र इंगोले साहेब, शिरोली वेतन केंद्राचे नैताम साहेब घाटंजीतील वीज कंत्राटदार संघपाल कांबळे, अमोल पेटेवार, जय अक्कलवार, आणि आभार प्रदर्शन धनराज पेटेवार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपवीभागातील व सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. प्रसंगी सायंकाळी सुरमई संगीताचे आयोजन करण्यात आले. यात संचाने एकापेक्षा एक गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थितांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
0 comments:
Post a Comment