Ads

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावे

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेची मंजूर व पात्र लाभार्थ्यांनी आपले अनुदान आधार सीडींग बेसनुसार प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, बँक पासबुक व राशन कार्ड दारिद्रय रेषेखालील कार्ड असेल तर आपला मोबाईल नंबर व संजय गांधी लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आपल्या गावातील तलाठी किंवा कोतवाल यांचे कडे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार विजय साळवे व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय होटे यांनी केले आहे.
Eligible beneficiaries of Sanjay Gandhi and Shravan Bal Yojana should submit the documents
तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून मिळणारे मानधन अनुदान यापुढे आधार सीडींग बेस्ट पेमेंट महाडीबीटी नुसार मिळणार असल्याने यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले स्वतःचे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड व स्वतःचा मोबाईल क्रमांक दिव्यांग प्रमाणपत्र देणे बंधनकारक असून या आधार बेस पेमेंट नुसार राज्य शासनाचे अनुदान हे लाभार्थ्याच्या कुठल्याही बँक शाखेत अथवा पोस्ट खात्यात सहजरित्या उपलब्ध होणार असल्याने आता
लाभार्थ्यांना अनुदान घेण्यासाठी जो
गर्दीचा त्रास होता.तो
या त्रासातून मुक्त होऊन हा लाभार्थी आपले योजनेचे अनुदान आधार कार्डवर कुठल्याही ग्राहक सेवा केंद्र अथवा पोस्ट ऑफिस अथवा बँकेत अनुदानाची उचल करणे आता लाभार्थ्यांना अतिशय सुलभ होणार आहे.या अनुषंगाने राज्य शासनाने घाटंजी शहरासह तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थ्यांनी आपले अनुदान आधार बेस् पेमेंट घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक पासबुक व मोबाईल नंबर कमीत कमी दिवसांत जमा करावे अन्यथा एप्रिल २०२४ च्या पुढील अनुदान येणार नाही. असे आवाहन तहसील विजय साळवे व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय होटे यांनी केले आहे. संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर आपले अनुदान किती आले कुठे आले याची सखोल अशी माहिती आपल्या मोबाईलवरच उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांची होणारी आर्थिक लूट मात्र निश्चित थांबणार आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने कठोर नियमावली करून भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना पुढील अनुदान हे आधार सीडिंग व आधार बेस पेमेंट योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ आधार कार्ड बँक पासबुक व मोबाईल नंबर आपल्या गावातील तलाठी किंवा कोतवाल यांच्या कडे जमा करण्याच्या आवाहन तहसीलदार विजय साळवे व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार संजय होटे छाया जाधव मॅडम अव्वल कारकून व स्वप्निल जुमळे महसूल कारकून यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment