Ads

तळोधी (बा.) वनक्षेत्रात अवैध मुरूम उत्खनन

( प्रशांत गेडाम)नागभीड- नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रात अवैधरीत्या मुरूम उत्खनन करणान्यांवर वनविभागाच्या पथकाने धाड टाकली. सदर धाडीत 2 जेसीबी व ३ ट्रॅक्टर जप्त केले. अवैधरीत्या उत्खनन करणार्या विरुद्ध गुन्हा दाखत करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, १४ मार्च रोजी तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केली.
Illegal Murum mining in Talodhi (Ba.) forest area
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातीत गोविंदपूर बिटात अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. यासोबतच लावारी पेथील संरक्षित वनक्षेत्रात उत्खनन केले जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने दोन्ही ठिकाणी धाड टाकून उत्खनन करणारे जेसीबी मशीन व तीन ट्रेक्टर जप्त केले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी आरूप कन्नमवार, सहायक क्षेत्र सहायक आर. एस. गायकवाड, वनरक्षक बि. के. तोरते, वनरक्षक राजेंद्र भरणे, पी. एम. श्रीरामे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment