Ads

बॉडी बिल्डिंग 2nd चंद्रपूर श्री 2024 चा मानकरी ठरला सुरज तिवांडे

चंद्रपूर :-नुकतीच दुसरी चंद्रपूर बॉडी बिल्डिंग जिल्हास्तरीय स्पर्धा मिस्टर चंद्रपूर श्री 2024 मेंस अंड वुमन्स स्थानीय मनपा ग्राउंड गांधी चौक चंद्रपूर येथे घेण्यात आले. चंद्रपुर बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोशिएशन Chandrapur Bodybuilders and Fitness Associationव्दारा आयोजित तथा सलग्र : बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोशिएशन, विदर्भ / इंडियन बॉडीबिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन
आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोशिएशन, / महाराष्ट्र ऑलंम्पिक असो./महाराष्ट्र क्रिडा परिषद (म.रा.) यांच्या मान्यतेने घेण्यात आली.
Body Building 2nd Chandrapur Shri 2024 winner Suraj Tiwande
सदर स्पर्धेत बेस्ट पोझर संकेत भगत ठरला तर बेस्ट मस्कुलर शिवाजी वाकोडे,बेस्ट इम्प्रूवमेंट अमर चट्टे, मिस्टर चंद्रपूर श्री 2024 सुरज निवांडे, बेस्ट वुमन अलका मोटघरे, बेस्ट मास्टर किशोर मसादे यांनी बहुमान पटकावला या स्पर्धेचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बिल्डर श्री निलेश जोगी तसेच मिस युनिव्हर्स गोल्ड मेडल विद्याताई धांडे यांची विशेष उपस्थित होते .
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रिजभूषण पझारे म्हणाले की व्यायामामुळे शरीर निरोगी राहते तसेच निरोगी शरीरामुळे यश संपादन करता येते. असोसिएशनचे अध्यक्ष विशाल निंबाळकर म्हणाले की चंद्रपूर बॉडी बिल्डिंगअसोसिएशनच्या स्पर्धेमुळे चंद्रपुरातील बॉडी बिल्डर्स यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे तसेच असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश भाऊ सोलापण यांनी बॉडी बिल्डिंग जिल्हास्तरीय स्पर्धेच्या आयोजन करण्यात आल्यामुळे चंद्रपुरातील बॉडी बिल्डर्स यांना भाग घेण्याची संधी मिळत आहे. भविष्यात सुद्धा असे स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने मंचावर उद्घाटक म्हणून ब्रिजभूषण पाजारे , चंद्रपूर माजी सभापती, भा.ज.पा. महामंत्री, चंद्रपूर, जिल्हा अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, चंद्रपूर तसेच चंद्रपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष भा.ज.यु.मो. महानगर अध्यक्ष, चंद्रपूर, माजी नगरसेवक, म.न.पा., चंद्रपूर विशाल भाऊ निंबाळकर, उपाध्यक्ष (CBBFA) राजेशभाऊ सोलापन, कार्याध्यक्ष हेमराजभाऊ हिवसे ,महासचिव सुभाष लांजेकर, सहसचिव प्रशांत पोगुलवार, कोषाध्यक्ष विवेक बुरडकर ,गणेश रामगुंडेवार ,सावन कालीवाले आदी उपस्थित होते .कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचा सत्कार व कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment