चंद्रपुर :-आमदार प्रतिभा धानोरकर यांना भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा तर्फे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर झाली असून इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उद्या दि. 27/03/2024 रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहे
MLA Pratibha Dhanorkar, official candidate of India Alliance Congress for Chandrapur-Vani-Arni Lok Sabha will file nomination form tomorrow.
इंडिया आघाडी च्या उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी प्राप्त झाल्याने उद्या सकाळी 11.00 वा. कोहीनुर ग्राऊंड, दादमहल वार्ड, चंद्रपूर येथून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार, माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विष्वास नांदेकर, राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, संदीप गिÚहे जिल्हाध्यक्ष उ.बा.ठा. गट, दिलीप चौधरी मराठा सेवा संघ, सोहेल शेख जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी, अरुण भेलके सी.पी.एम नेते, प्रकाश रेड्डी सी.पी.आय. नेते, रविंद्र उमाटे आयटक नेते, मयूर राईंचवार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, संजय देरकर यासह अनेक इंडिया आघाडीतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11.00 वा. हि रॅली कोहीनुर मैदानाजवळून गांधी चौक मार्गे जाणार असून सदर रॅलीचा समारोप न्यु इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे होणार आहे. यानंतर दु. 3.00 वा. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment