भद्रावती तालुका प्रतिनिधि - जि. प. उच्च प्राथमिक शाळा कुनाडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ढोरवासा केंद्राच्या निपुणोत्सव मध्ये कोच्ची शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.निपुणोत्सव उपक्रम कार्यशाळेत जि. प. कोच्ची शाळा अव्वल
Nipunotsav Activities Workshop Z.P Kochi School Top
गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाला मार्गदर्शक श्री भारत गायकवाड सर केंद्रप्रमुख ढोरवासा, तज्ञ मार्गदर्शक श्री राजू चौधरी सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी, श्री वसंत जांभुळे सर जिल्हा परिषद शाळा चारगाव, सौ वंदना बोढे मॅडम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळवाडा, सौ मनीषा चन्नावार मॅडम जिल्हा परिषद शाळा तेलवासा, माधुरी चिंचोलकर मॅडम जिल्हा परिषद शाळा कोची हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री दोहोतरे सर, प्राचार्य कर्मवीर विद्यालय गवराळा, सौ बन्सोड मॅडम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा, सौ नाकाडे मॅडम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनाडा, श्री मासळकर सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी, श्री वांढरे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा होणार, श्री बोरकर सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळवाडा, श्री मानकर सर डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुरसा हे उपस्थित होते
निपुणोत्सव कार्यक्रमाची सुरुवात नव्यानेच रुजू झालेले श्री जांभुळकर सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनाडा यांच्या संचालनाने झाली.
नवनवीन अशा चारोळ्यातून त्यांनी उत्कृष्ट संचलनाला सुरुवात केली.
उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सर्वप्रथम पूजन करण्यात आले.
सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे निपुण शाळा घोषित केलेल्या शाळेतील शिक्षकांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री गाडगे सर ढोरवासा यांच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नागपूर येथे होणाऱ्या इन्स्पायर अवार्ड करिता निवड झाल्याबद्दल त्त्यांचाही सत्कार करण्यात आला.
तसेच केंद्रात नव्यानेच रुजू झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर श्री गायकवाड सर केंद्रप्रमुख ढोरवासा यांनी आपल्या प्रास्ताविकेत शिक्षण म्हणजे जात्यात भरडलेले दळण नसून, बालवयातच दिलं जाणारं सुसंस्कारक्षम वळण आहे असे सांगून शिक्षकांना विद्यार्थी निपुण कसे करण्यात येईल यासाठी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी महाभारतातील अर्जुन दुर्योधन याचे देखील उदाहरण दिले. त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ दिसून आली. वातावरणात थोडा बदल म्हणून श्री गायकवाड सर यांनी 'आनंद फुले स्वानंद मुले' हे सुंदर गीत सादर केले आणि सर्व शिक्षकांनीही त्यांना साथ दिली.
तसेच निपुण शाळेमध्ये
प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा कोची
द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा तेलवासा तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा चारगाव चौथा क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी
पाचवा क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊळवाडा यांचा देण्यात आला.त्यानंतर निपुण शाळेतील शिक्षकांनी पीपीटी द्वारे शाळेतील विविध उपक्रमाचे सादरीकरण केले व यशोगाथा सांगितली.
सर्वप्रथम श्री राजू चौधरी सर चिरादेवी यांनी परिपाठ ,बोलक्या भिंती, निबंध लेखन ,अनुलेखन अशा विविध उपक्रमाची माहिती दिली.
वंदना बोढे मॅडम देऊळवाडा यांनी पाढे पाठांतर ,वाचन उपक्रम, विषय मित्र अशा उपक्रमांची माहिती दिली. आणि शाळेत दोन शिक्षक असून सुद्धा त्यांनी आपली शाळा निपुण शाळा कशी केली याबाबत माहिती दिली. तसेच निपुण जीआर ची सखोल माहिती सर्व शिक्षकांना स्पष्ट करून सांगितली.
सौ माधुरी चिंचोलकर मॅडम, जिल्हा परिषद शाळा कोची यांनी लोकवर्गणी ,लोकसहभाग यातून शाळेचा विकास कसा केला याची माहिती दिली. गणितीय गप्पा, साहित्य जत्रा ,सेल्फी पॉईंट, मराठी भाषा दिन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
मनीषा चन्नावार मॅडम, तेलवासा यांनी शाळेतील इंग्रजी विषयक उपक्रमाची माहिती दिली आणि शाळेत एकच शिक्षिका असताना सुद्धा निपुण शाळा घोषित केली.
उर्मिला बोंडे मॅडम ,गवराळा यांनी वर्ग पाचवी साठी इंग्रजी विषयासाठी केलेल्या उपक्रमाची माहिती दिली त्यांचा Tenses वर आधारित बारा वाक्य लिहिणे या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
श्री गाडगे सर ढोर वासा यांनी इन्स्पायर अवार्ड करिता साहित्य कमी खर्चात कसे तयार करावे याचे मार्गदर्शन केले.
निपुण शाळेतील सर्व शिक्षकांचे शील्ड देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर निपुण शाळेतील शिक्षिका सौ बोढे मॅडम,चन्नावार मॅडम, चिंचोलकर मॅडम यांनी साहित्य प्रदर्शनी भरवली होती. विविध साहित्याचा उपयोग त्यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना देखील सांगितला.
केंद्रातील निपुण मित्र म्हणून
श्री राजू चौधरी सर ,सौ सुप्रिया कोडापे मॅडम ,कु. त्रिरत्ना चांदेकर मॅडम यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुनाडा शाळेच्या शिक्षिका सौ वनिता बल्की मॅडम यांनी केले.
0 comments:
Post a Comment