Ads

' त्या 'आकाशला आवरा कुचन्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ,गुटख्याची खुलेआम विक्री

वरोरा(प्रती):- आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर शासनाने प्रतिबंध लावला आहे असे असतांना सुद्धा माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुचना गावातून तसेच माजरी, वणी परिसरात सर्रासपणे खुलेआम सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत असून त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे
Open sale of banned flavored tobacco, Gutkha in kuchna
कुचना येथील आकाश नामक व्यक्ती हा नवीन वस्तीत वास्तव्यात आहे, याच ठिकाणी किराणा दुकान आणि घर आहे सदर दुकानातून सुगंधित तंबाखूची तसेच गुटख्याची चिल्लर विक्री करतो तर घरातून व परिसरात ठोक विक्री करतो गेल्या अनेक दिवसापासून आकाश हा सर्रासपणे खुलेआम सुगंधित तंबाखूची विक्री करत असल्याची माहिती हाती आली आहे
आकाश आणि बल्लारपूर येथील एक आरोपी यांच्याकडून दोन महिन्यापूर्वी सुगंधित तंबाखू तसेच गुटखा जप्ती करून कारवाई करण्यात आली होती परंतु पोलीस स्टेशनला न जुमानता सर्रासपणे विक्री चालू असून माजरी येथील नवे ठाणेदार सारंग मिराशी यांच्या पुढे मोठे आव्हान ठरल्याचे बोलल्या जाते
आकाश हा मानगाव, राळेगाव, थोरांना ,पाटाळा, माजरी नवीन वस्ती माजरी कॉलरी पळसगाव तसेच वणीच्या परिसरात सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री करत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.सुगंधी तंबाखूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्याचे विकार ,हृदयरोग, छातीत दुखणे, हृदविकाराच्या झटकामुळे अचानक मरण येणे स्ट्रोक (मेंदूचा विकार) परिधीय संवहनी रोग (पायाचा गॅंग्रीन) हे रोग होतात
परिसरातील तरूण तसेच शाळकरी विद्यार्थी गुटख्याच्या तसेच तंबाखूच्या आहारी जाण्याची दाट शक्यता असुन माजरी येथील नवे ठाणेदार सारंग मिराशी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment