Ads

कत्तलीसाठी जाणाऱ्या २५ बैलांची सुटका

चंद्रपुर :-राजुरा परिसरातून लक्कडकोट मार्गे हैद्राबाद (तेलंगाना) शहरात विनापरवानगी 25 बैल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला विरुर पोलिसांनी जप्त करून त्यातून 25 बैलांची सुटका केली. हे सर्व बैल कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Rescue of 25 bulls going to slaughter
दि. १४/०३/२०२४ रोजी पोस्टॉप खाजगी वाहणाने लक्कडकोट बिटमध्ये पेट्रोलींग करीत असताना मुखबिर कडुन खबर मिळाली की, राजुरा कडुन लक्कडकोट मार्गे हैद्राबाद (तेलंगाना) येथे एका तेलंगाना पासिंग च्या कंटेनरमध्ये जनावराची वाहतुक होत आहे अशा माहीती वरुन पोस्टॉपनी आर.टी. ओ. नाका, लक्कडकोट येथे पंचासमक्ष नाकाबंदी केली असता रात्रो २३/२० वा. दरम्यान आर.टी. ओ. नाका येथे खबरेप्रमाणे एक कंटेनर येताना दिसले तेव्हा कंटेनरला हात दाखवुन थांबविले असता कंटेनरच्या चालकाने कंटेनर रोडच्या बाजुला थांबवीले. सदर कंटेनर हे भारत बेन्ज कंपनीचे क. TS 12 UD 5321 असे होते. सदर वाहनातील इसमांना नावे विचारली असता, चालक नामे सैय्यद फारुख सैय्यद युसुफ वय ३८ वर्ष रा. महमुद नगर, किशनबाग, बहादुरपुरा हैद्राबाद (तेलंगाना) तसेच १) शेख जलील मोहमद शेख वय ३८ वर्ष रा. इलीयासनगर ता. नारनुर जि. अदिलाबाद (तेलंगाना) २) कबिर जैनुद्दीन शेख वय २५ वर्ष रा. गुडसेला ता. जिवती जि. चंद्रपुर असे सांगितले. सदर वाहनामध्ये काय आहे याबाबत चालकास व इतर दोन इसमांना विचारपुस केली असता तिघेही उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने पोस्टे स्टॉपनी सदर कंटेनरची पंचासमक्ष पहाणी केली असता सदर वाहणामध्ये दाटीवाटीने हालचाल करता येणार नाही व चारापाण्याची व्यवस्था न करता बैल जातीचे २५ नग जिवंत जनावरे मिळुन आले. सदर जनावरे कोणाचे आहे व कुठे घेवुन जात आहे अशी विचारणा केली असता सदरचे जनावरे हे गडचांदुर येथील अज्जु कुरेशी यांची असल्याची व हैद्राबाद येथे कत्तलखाण्यात घेवुन जात असल्याचे सांगितल्याने त्यांचे ताब्यातुन पांढऱ्या रंगाचे १७ नग जिवंत बैल व लाल रंगाचे ८ नग जिवंत बैल असे एकुण २५ नग जिवंत बैल प्रतेकी किं. २५,०००/- रु प्रमाणे ६,२५,०००/- रु व भारत बेन्ज कंपनीचा कंटेनर क. TS 12 UD 5321 अंदाजे किं. २१,००,०००/- रु असा एकुण २७,२५,०००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यात घेवुन पोस्टेला येवुन वरील नमुद आरोपी विरुध्द अप क्र. ७७/२४ महा. प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ चे कलम ५ ब,९,११, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (क), मोटरवाहन अधिनियम-१९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी ही मा. मुमक्का सुदर्शन , पो.अ. चंद्रपुर,.रिना जनबंधु मॅडम, अपर पो. अ. चंद्रपुर तसेच मा. श्री. दिपक साखरे , उपवि.पो. अधि. राजुरा यांचे मार्गदर्शनात सपोनि. संतोष वाकडे, ठाणेदार पोहवा. सुभाष कुळमेथे, नापोअ. विजय मुंडे, पोअं. राहुल वैद्य, पोअं. प्रमोद मिलमिले, पोअं. सचिन थेरे, पोअं. अतुल शहारे, पोअं. गजानन चारोळे, पोअं. रामदास निलेवार, पोअं. प्रविन जुनघरे, चालक पोअं. काकासाहेब, सर्व पोलीस स्टेशन, विरुर यांनी केलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment