Ads

दूधशेष मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने रक्कम लांबविली.An unknown thief stole the money by breaking the donation box in Dudhshesh Temple.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-शहरातील दुधाळा तलावाच्या काठावर असलेल्या दुदशेष महाराज मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम लांबविल्याची घटना दिनांक नऊ रोज शनिवारला सकाळी उघडकीस आली. 
An unknown thief stole the money by breaking the donation box in Dudhshesh Temple.
सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा  दाखल केला आहे. पोलीस अज्ञात चोट्याचा शोध घेत आहे. महाशिवरात्रीनिमित्त सदर मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती व ही दानपेटी गेल्या दोन वर्षात उघडण्यात आली नसल्यामुळे या दानपेटीत मोठी रक्कम असावी असा अंदाज आहे. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री नंतर दानपेटी फोडून रोख रक्कम लांबविली व चिल्लर पैसे दानपेटीतच सोडुन दिले. सकाळी ही दानपेटी फोडल्याचे लक्षात आल्यानंतर सदर घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली. शहरात या आठवड्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या चोरट्यांना पकडण्यात अद्याप पर्यंत भद्रावती पोलिसांना यश आलेले नाही. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment