Ads

चरुर खटी रस्त्याच्या दुरवस्थेमूळे ग्रामस्थ त्रस्त

(सादिक थैम)वरोरा :‌ वरोरा ते‌‌ माढेळी या मुख्यमार्गापासून चरूर खटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.यामुळे शाळेकरी मुलं आणि वृद्ध यासह सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी उपसरपंच विवेक नांदे यांनी केली आहे.रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
Villagers suffering due to poor condition of Charur Khati road
वरोरा तालुक्या पासून सहा किमी अंतरावर माढेळी मार्गावर असलेल्या चरुर खटी या गावी जाण्यासाठी पाटीवर उतरावे लागते. या या ठिकाणावरून गावात जाण्यासठी‌ मार्ग तयार करण्यात आला आहे. परंतु या मार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक यासह सर्व ग्रामस्थ या मार्गाने जात असतात. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. चरूर खटी रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरावस्तेकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. मुख्य म्हणजे या गावात वेकोलिने सीएसआर फंडातून हा रस्ता त्वरित बनवावा अशी मागणी अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ करीत आहेत. एकोणा कोळसाखान्यातील ब्लास्टिंगमुळे‌ आणि घरांना भेगा पडल्या असून याची नुकसानभरपाई वेकोलिद्वारे त्वरित देण्यात यावी अशी मागणी ही आता नागरिक करीत आहे. नुकसान भरपाई आणि रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास उपोषण करण्यात येईल अण्णा इशारा उपसरपंच विवेक नांदे यांनी दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment