राजुरा :-जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ष 1988 - 89 मध्ये इयत्ता दहावी वर्षांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जि प हायस्कूल राजुरा या शाळेत संपन्न झाला.
Let's learn a day school and be young again.
School filled again by former students.
यामध्ये एकूण साठ माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उपस्थितीत दर्शविली. या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचे कार्य प्रमोद साहारे यांनी केले. तसेच कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचे बहुमूल्य काम राजू गोखरे, राकेश करनेवार, राजू डोहे , नरेश खोब्रागडे, सुनील ठाकरे, विनीत मत्ते , मीना वडस्कर , माधुरी वाटेकर व इतर मित्रांचे या ठिकाणी सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये त्यावेळेस शिकविणारे शिक्षक चामाटे , शिक्षिका ठाकूरवार , आंबेटकर मोहरले या पाहुण्यांनी प्रामुख्याने स्नेह मेळाव्यामध्ये सहभाग दर्शविली. तसेच जि. प .शाळेचे मुख्याध्यापक उईके यांचे फार मोठे योगदान लाभले. सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन जुन्या गोष्टीला उजाळा दिला. खूप गप्पागोष्टी केल्या विविध खेळ खेळण्यात आले विविध गाण्याचा कार्यक्रम आयोजित त्यानंतर शेवटी स्नेहभोजन करून सर्वांनी निरोप घेतला.
0 comments:
Post a Comment