Ads

पोलीस ठाणे सिन्देवाही हद्दितील सराईत गुन्हेगार 2 महिण्याकरीता तडीपार

चंद्रपुर :-सिन्देवाही तालुक्यातील मौजा लाडबोरी येथील सराईत गुन्हेगार भास्कर नानाजी कारमेंगे, वय 50 वर्ष याचेवर यापुर्वी, खुन, दारुबंदी व जुगार कायद्यान्वये असे एकुण 15 गुन्हे नोंद आहेत. त्याचेवर यापुर्वी विविध कलमान्वये करण्यात आली होती.
Criminal within Police Station Sindewahi limits deported for 2 months
परंतु त्याचेवर त्याचा काहीही परीणाम झालेला नव्हता. तो प्रतीबंधक कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याचेविरुध्द गंभीर दखल घेवुन सराईत गुन्हेगार भास्कर नानाजी कारमेंगे, वय 50 वर्ष रा. लाडबोरी ता. सिन्देवाही याचे वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. उपविभागीय अधिकारी सा. चिमुर यांनी सराईत गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने व सार्वत्रीक लोकसभा विवडणुक 2024 ची आदर्श आचार संहिता लागु असल्याने त्यास 2 महिण्याकरीता चंद्रपुर जिल्ह्यातुन हद्दपार करुन त्यास मौजा साखरा जि. गडचिरोली येथे त्याचे नातेवाईकडे नेवुन सोडण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक सा. चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपुर, मा. दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात सपोनि तुषार अ. चव्हाण, स.फौ. विनोद बावणे यांनी अथक परीश्रम घेतले. सिन्देवाही तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता अशा प्रकारचे वारंवार गुन्हे करणारे व पोलीस कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगाराची माहीती संकलीत करुन त्याचेविरुध्द तडीपारी अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment