चंद्रपुर :-चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार यांना भोई समाजातर्फे समर्थन प्राप्त झाले आहे.या संदर्भातील एक पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना बल्लारपूर येथील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात सुपूर्त करण्यात आले.
यावेळी भोई समाज क्रांती दल प्रदेश अध्यक्ष प्रकाश लोणारे,चंद्रपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संघ संचालक सदस्य चंद्रपूर भोई समाज सेवा संघ,मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था सदस्य डॉ दिलीप शिवरकर, विजय नान्हे संचालक चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघ अध्यक्ष लक्ष्मण टोकला गंगा पुत्र भोई समाज सेवा संस्था, योगेश घुमलवार उपाध्यक्ष गंगापुत्र भोई समाज सेवा संस्था चंद्रपूर, अमोल बावणे, योगेश पचारे सदस्य भोई समाज सेवा संघ, भोई समाज नेते रुपेश मांढरे,दीपक कामतवार, संतोष नागपुरे,राकेश मांढरे कांचन दाते याची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment