Ads

गुरूला मिळाली शिष्याची साथ,तीन नेते एकसाथ

चंद्रपुर :-चंद्रपूर लोकसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्या नंतर सर्व कार्यकर्ते गुप्त प्रचारात व्यस्त झाले आहे.महत्वाचे म्हणजे चंद्रपुरातील ना सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व आमदार किशोर जोरगेवार एकत्र आल्याने या विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.बुधवारी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या सभेत आ.जोरगेवार यांनी ना.मुनगंटीवार यांना गुरूची उपमा देत,त्यांना विजयी करण्याचा संकल्प केल्याने गुरूला मिळाली शिष्याची साथ अशी चर्चा आहे.
The Guru got the support of the disciple, three leaders together
यातच रामनवमीच्या शोभायात्रेत हंसराज अहिर यांनी हजेरी लावून तिघांनी रामभक्तांचे अभिनंदन केल्याने नको त्या चर्चांना विराम मिळाला.
वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे.यात महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर,तेलगू शिंपी समाज,फार्मर प्रोड्युसर कम्पनी,राजपूत समाज,बीआरएस,जनआक्रोश संघटना,यंग चांदा ब्रिगेड,धनोजे कुणबी समाज संघटना,धनगर समाज,खेडुले कुणबी समाज,भोई समाज,हिंदी भाषिक ब्राह्मण समाज,चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभा,जिल्हा मच्छिमार संघ,यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सुधीरभाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment