(सादिक थैम) वरोरा: मागील महिन्यात वरोडा शहरात तसेच परिसरातील पावना या गावी झालेल्या दोन घर फोडीच्या घटनेत एकूण 96 हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली होती. वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्याच्या संदर्भात आज 16 एप्रिल रोज मंगळवारला एकूण पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून दोन्ही गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल व तीन मोटरसायकल असा एकूण तीन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभुळे, हेड कॉन्स्टेबल दिलीप सुर, दीपक दुधे, मोहन निशाद,विशाल राजूरकर, महेश गावतुरे ,राजू लोधी, संदीप मुळे, शशांक बादमवार यांनी केली.
0 comments:
Post a Comment