Ads

कुख्यात चोर व तंम्बाखु तस्कर याचेवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत कारवाई

चंद्रपुर :-पो.स्टे. दुर्गापूर येथील अभिलेखावरील आरोपी नामे प्रशांत अरूण फुलकर वय 35 वर्षे रा. सुमित्रा नगर, चंद्रपूर याचेवर विवीध पो.स्टे.अंतर्गत घरफोडी, चोरी, गंभीर दुखःपत तसेच सुगंधीत तम्बाखूची तस्करीचे गुन्हे नोंद असून त्याची पो.स्टे. परिसरात दहशत असून सामान्य जनतेत दहशत निर्माण केली असून गुन्हेगारी कारवाया चालु ठेवल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई केली असतांना
Action under law MPDA of Superintendent of Police Mummaka Sudarshan against the notorious thief and Tambakhu smuggler.
सुद्धा सदर आरोपी हा कायदयाला जुमानत नसल्योन त्या बाबतची मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दखल घेवून सदर इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टी, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्तीव दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचे काळाबाजार यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबत अधिनियम, 1981 (सुधारणा 2009, 2015) अन्वये प्रस्ताव तयार करून मा.श्री. विनय गौडा भा.प्र.से., जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर केला असता त्यांनी सदर प्रस्तावाची दखल घेवून सदर प्रस्तावीत इसम प्रशांत अरूण फुलकर वय 35वर्षे रा.सुमित्रा नगर, चंद्रपूर यास नमुद कायदया अंतर्गत 12 महिण्या करीता स्थानबद्ध करण्याची आदेश निर्गमीत केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन भा.पो.से., अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहायक पोलीस अधीक्षक, नवमी साठम भा.पो.से. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाढीवे, पो.स्टे. दुर्गापूर, पोलीस निरीक्षक, महेश कोंडावार स्था.गु.शा.चंद्रपूर, स.पो.नि. योगेश खरसान स्था.गु.शा. चंद्रपूर, पो.उपनि.गिरीष मोहुतूरे पो.स्टे. दुर्गापूर, पो.हवा. अरूण खारकर, मनोज रामटेके, सुधीर मत्ते, परवरीश शेख स्था.गु.शा.चंद्रपूर, पो.कॉ. मंगेश शेंडे, पो.स्टे. दुर्गापूर यांनी सदरची कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment