Ads

सिंदेवाही ठेकेदार व मित्र परिवार एसोशिएशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौकात महाप्रसाद वितरण

( प्रशांत गेडाम)सिंदेवाही- भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक येथे सिंदेवाही ठेकेदार व मित्र परिवार असोशिएशन कडून महाप्रसादाचे वितरण करण्यातआले.
Dr. Sindewahi Contractor and Mitra Parivar Association. Mahaprasad distribution at Shivaji Chowk on the occasion of Babasaheb Ambedkar's birth anniversary
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण प्रमुख उपस्थिती मध्ये जे. टी. मेश्राम सर,शिक्षिका वसाके मॅडम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष सिंदेवाही चे गणेश मेश्राम,प्रशांत गेडाम , संजू भाऊ शेंडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित अतिथींचे भाषणे घेण्यात आले कार्यक्रमाचे संचालन विकास गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत गेडाम यांनी केले.उपस्थितमान्यवरांच्या हस्ते सिंदेवाही ठेकेदार व मित्र परिवार एसोशिएशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले‌.कार्यक्रमाला विषयष सहकार्य म्हणून युवराज वाकडे, सतीश भाऊ रणदिवे सामाजिक कार्यकर्ता,अमोल गुरुनुले, जनबंधू ,निखारे सर यांनी सहकार्य केले होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment