Ads

गोंडपिपरीला दिलेला शब्द पाळला; काँग्रेसने काय दिले?

चंद्रपूर :-गोंडपिपरीच्या सभेत विकासनिधी आणण्याचा शब्द मी दिला होता.23 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी आणून मी शब्द पूर्ण केला, पण काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीने काय केले?, असा खडा सवाल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केला. मला लोकसभेत निवडून दिले तर गोंडपिपरीचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त करून आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणा, असे आवाहनही त्यांनी केले.
He kept his word to Gondpipari; What did Congress give?
गोंडपिपरी येथे गुरुवार, 11 एप्रिल रोजी आयोजित सभेला ना. मुनगंटीवार संबोधित करत होते. यावेळी माजी आमदार एड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, बबन निकोडे, अमर बोडलावार, चेतनसिंग गौर, मनिषा मडावी, मनिषा दुर्योधन, शारदा गरपल्लीवार, अश्विनी तोडासे, कोमल फरकाडे, सुरेखा श्रीकोंडावार व अॅड. अरुणा जांभुळकर आदींची उपस्थिती होती.

गोंडपिपरी परिसराचा विकास करण्याची माझी तीव्र इच्छा असून हे कार्य तुमच्या आशीर्वादाशिवाय अशक्य आहे. जर तुम्ही मला निवडून दिले तर गोंडपिपरीतील अपूर्ण कामे पूर्ण करेन. कित्येक पट भरभरून विकास आपल्या वाट्याला येईल. जो देशाच्या बाजूने उभा राहिला त्याच्या बाजूने हा देश उभा राहील, अशी सादही ना. मुनगंटीवार यांनी घातली.

एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र, सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, स्टेडियम, सामाजिक सभागृह, नाट्यगृह, चिचडोह प्रकल्प अशा अनेक विकास कामांचा उल्लेख करताना ना. मुनगंटीवार म्हणाले,मोदी सरकार येणे निश्चित असून मोदींचा विकासरथ गोंडपिपरीपर्यंत आणण्याचे मी वचन देतो. मोदीजींना साजेसा खासदार तुम्ही निवडून दिला तर महिला, बेरोजगार, बचत गटांचा लोकसभेत आवाज बुलंद करेन.संसदेला चंद्रपूरचे दरवाजे लावलेले असल्यामुळे ‘खुल जा सिमसिम’ असे म्हणताच आपल्यासाठी अर्ध्या रात्रीही हे दरवाजे खुले होतील तसेच राज्य आणि केंद्राच्या तिजोरीतील निधी देखील गोंडपिपरीच्या विकासासाठी आणता येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment