चंद्रपूर : चंद्रपुरात एकीकडे सूर्यदेव तापू लागला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे या तापमाणात यात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे. नाक्यानाक्यावर मतदानाची बेरीज,वजाबाकी करताना मतदार दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महायुती, महाआघाडीत थेट लढतीचे चित्र आहे. मात्र प्रचारात प्रतिभा धानोरकरांनी आघाडी घेतली आहे. आज वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला. या दौऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विशेष करून कॉर्नर सभा, मोठ्या सभांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना घराच्या स्लॅबवर बसून धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती.

0 comments:
Post a Comment