( प्रशांत गेडाम)सिंदेवाही :-दि 28 मंगळवार ला व.-29 बुधवार ला सकाळी 9 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही चे उपविभागीय अभियंता यांचा मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी आडकाठी ठरलेल्या अतिक्रमणाचा तिढा आता मार्गी लागला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वारंवार खंडित होणारी अतिक्रमण हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही चा अधिकार्यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली.
सिंदेवाही तहसील विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग सिंदेवाही व पोलीस विभाग सिंदेवाही, प्रशासनाचा निर्देशानुसार पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आज अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालला. या कारवाईनेअतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी सिंदेवाही तहसील विभाग चे तहसीलदार पानमंद, सार्वजनिक बांधकाम विभाग चे उपविभागीय अभियंता शटगोपनवार ,नायब तहसीलदार तुमराम,मंडळ अधिकारी चीडे,तोडसाम तलाठी झाडे ,सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता,वानखेडे ,राठोड सिंदेवाही तसेच पोलीस ठाणेदार चव्हाण, पी. एस.आय महाले एम.एस.सी.बी. चे
अभियंता शहारे व त्यांचे सहकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व त्यांचे कर्मचारी आदींच्या उपस्थिती होती व अतिक्रमण हटाव मोहिम यशस्वी ठरली
0 comments:
Post a Comment