बल्लारपूर :- पत्नीच्या विरह सहन न झाल्याने पतीने फाशी घेतल्याची घटना आज ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. स्वप्नील रमेश करमनकर वय ३३ वर्ष असे त्या पतीचे नाव आहे.
स्थानीय विद्या नगर वॉर्ड येथील स्वप्नील रमेश करमनकर रहिवासी आहे. त्यांचे तीन वर्ष अगोदर लग्न झाले होते. मागील सात आठ महिन्यांपासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. त्याचा पत्नीने त्याच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्र मध्ये तक्रार केली होती तसेच त्याला पोटगी मागत होती. तो मजुरी चे काम करत होता तसेच त्याच्या जवळ पत्नी राहत नव्हती म्हणून तो काही दिवसापासून मानसिक तानात होता. ते जय भीम बहुउद्देशीय संस्था जय भीम चौक येथील कार्यकर्ते देविदास करमनकर यांचे पुतणे आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केले व शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 comments:
Post a Comment