मुबई प्रतिनिधी : डॉ.ज्योती जोगदंड यांची आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या होमिओपॅथी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आमीर मुलाणी, डॉ.एस.एन.सुतार, डॉ.शाहिन मुलाणी, डॉ.साक्षी सुतार, डॉ.मनिषा गुरव, डॉ.ज्योती धावरे, डॉ.अनुराधा लोधी, डॉ.ज्योती सिरसाट, डॉ.पल्लवी माने, डॉ. कल्याणी मॅडम, डॉ.सिता भिडे, डॉ.विजयकुमार काळे व सर्व राष्ट्रीय व राज्य महिला व सर्व पदाधिकारी यांनी माहिती दिली.
Dr. Jyoti Jogdand has been elected as the Homeopathy Maharashtra State President of Ayush Bharat Doctors Association
संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष भारत डॉक्टर असोसिएशन व संघटना आहे. आयुष भारत संघटनेची कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण पुरवणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांची उभारणी करणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, 24 तास मोफत ॲम्बुलन्स सेवा पुरवणे, डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायावरती त्वरित मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे. तसेच डॉक्टरांच्या समस्या डॉक्टरांचे विविध प्रश्न यासाठी कार्य करणारी देशातली सर्वांत मोठी आयुष भारत संघटना ओळखली जात आहे. अशी माहिती आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी अध्यक्ष डॉ.ज्योती जोगदंड यांनी दिली.
0 comments:
Post a Comment