भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी :-भद्रावती तालुक्यातील वडेगाव गुडगाव येथील काही तरुण युवक दारू सोडण्याची औषध घेतल्याने अचानक तब्येत बिघडून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
Two die, two seriously after taking alcohol withdrawal medication.
सदर घटना तालुक्यातील गुळगाव येथे घडली. याप्रकरणी भद्रावती पोलीस पुढील कारवाई करीत आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे व 19 वर्ष व प्रतीक घनश्याम दडमल वय 26 वर्ष राहणार गुळगाव अशी मृतकांची नावे असून सदाशिव पुंजाराम जीवतोडे वय 45 वर्ष व सोमेश्वर उद्धव वाकडे वय 35 वर्षे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर चारही व्यक्ती दिनांक 21 ला गाडी करून वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे गेले होते व एका शेळके, वैद्याकडून दारू सोडण्याचे औषध घेऊन दुपारी आपल्या गावी परत आले. त्यानंतर या चौघांची ही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथे उपचारा साठी आणल्यानंतर वरील दोघांचा वाटेतच मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहे. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. मर्ग दाखल करण्यात आले घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment