Ads

कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेतून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ला

(सादिक थैम)वरोरा : एकोणा खाणीतील कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेतून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर शहरातील जाजू चौकात अडवून हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.
Attack on transport businessman over competition for coal transport
या प्रकरणी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग या तिघांवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटकही करण्यात आली आहे. वरोरा शहरातून होत असलेल्या कोळसा व्यवसायातील वाहतुकीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
कोळसा व्यवसायाच्या स्पर्धेतून एकोणा कोलमाईन्स परिसरात यापूर्वी गोळीबारापर्यंतच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, काही कोळसा वाहतूकदारांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी येथील रूपचंद्र राजबहादूर यादव यांचेही एकोणा कोळसा खाणीत ट्रान्सपोर्टिंगचे काम आहे. त्यांच्या वाहनाने ठाकूर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कोळसा वाहतूक केली जात असून, सध्या वर्धा जामणी येथील मानस ॲग्रो कंपनीला कोळसा पुरविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रूपचंद्र यादव स्वत:च्या दुचाकीने सकाळी १० वाजताच्या सुमारास एकोणा कोळसा खाणीमध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून वरोरामार्गे माजरी येथे जाण्यासाठी निघाले असता वरोऱ्यातील जाजू चौकात दोन मोठी वाहने त्यांच्या दुचाकीला आडवी करून या प्रकरणातील आरोपी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग खाली उतरले. बळजबरीने दुचाकीला आडवे होऊन शिवीगाळ करीत हल्ला करण्यात आला. तिघांनीही दांड्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
माजरी कॉलरी येथील फिर्यादी रामचंद्र यादव हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, आरोपींचाही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचीही वाहने एकोणा कोलमाईन्समध्ये कोळसा वाहतुकीच्या कामात असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. वरोरा शहरातून एकोणा खाणीतील कोळसा वाहतुकीला बंदी असताना काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रात्रीच्या सुमारास शहरातून वाहतूक करतात. याबाबत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून एकमेकांची पोलिसांना माहिती दिली जाते. यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याचा कयास बांधला जात असून, एकोणा कोळसा खाणीतील व्यावसायिक स्पर्धेतून यापूर्वी अनेक मारहाणीचे प्रकार घडले आहेत. गोळीबारापर्यंतही घटना पोहोचल्या असून, भविष्यात मोठे गँगवार होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपी जाकीर अयुब खान, आसिफ अयुब खान व विजय सिंग या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३४१, २९४, ५०६, ३४, ३२४ अन्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी जप्त केली असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment