Ads

नागरिकांच्या तक्रारीवरुन आमदार किशोर यांनी जिल्हा स्टेडियम येथे भेट देत केली विकासकामांची केली पहाणी

चंद्रपुर :-जिल्हा स्टेडियम हे चंद्रपूरातील प्रमूख ठिकाण आहे. भावी पोलीस येथे सराव करतात, अनेक खेळाडू येथून घडले आहे. जेष्ठ नागरिकांच्या व्यायामाचे हे प्रमूख ठिकाण आहे. त्यामुळे येथील विकासकामात हलगर्जीपणा करु नका, उत्तम दर्जाचे काम करत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांना केल्या आहे.
जिल्हा स्टेडियम येथे सुरु असलेल्या विकास कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान तक्रारींची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हा स्टेडियम येथे जात येथील कामाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांची उपस्थिती होती.
On the complaint of citizens, MLA Kishore visited the district stadium and inspected the development works
चंद्रपूरातील जिल्हा स्टेडियम येथे विविध प्रकारच्या खेळांसाठी सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहे. येथे खेडाळू सराव करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. येथील विविध विकासकामांसाठी मोठा निधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. यातून येथे स्विमिंग पुल सह विविध कामे केल्या जात आहे. तर अनेक कामे पुर्णत्वास आली आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहे. दरम्यान या कामाचा दर्जा खालवत चालला असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात केल्या होत्या.
दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कामाची पाहणी करत येथे येणा-या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील स्विमिंग टॅंगचे काम उत्तम दर्जाचे नसल्याचे नागरिकांनी सांगितले याचीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. येथील शौचालय स्वच्छ ठेवण्यात यावे, येथील क्रिडा साहित्य खेडाळूंसाठी उपलब्ध करण्यात यावीत अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांना केल्या आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील खेळाडूंचीही भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment