घाटंजी तालुका प्रतिनिधी :-घाटंजी येथील अग्रेसन ज्वेलर्स ते टेलर्स लाईन हा रस्ता निर्मनाधिन आहे. हा रस्ता बाजारपेठेला जोडला जातो या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे व्यवसायिक आहे नगरपरिषद मध्ये प्रशासक बसले तेव्हापासून घाटंजी शहराचा खेळ खंडोबा झालाय अनेक ठिकाणी नाल्या साफ केल्या जात नाही नावापुरता एक दिवस ट्रॅक्टर येतो नंतर तो दिसतच नाही प्रोफेसर कॉलनीतील नाल्या कित्येक दिवसापासून साफ केल्या गेल्या नाही येथील अग्रसेन जवळील रस्त्यावर सद्ध्या बोल्डर गिट्ट्या चे मोठमोठे ढिगारे रस्त्याचे मध्यभागात टाकलेले आहेत.. तसेच काही बोल्डर गिट्ट रस्त्यावर पसरलेला आहे. त्यामुळे रस्ता अपघातग्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.
Road accident suffered under Ghatji Nagar Parishad
सुमारे १ महिन्या पूर्वी या रस्त्याच्या कोंक्रेटीकरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन स्थानिक लोकप्रतिनधींकडून करण्यात आले होते.. मात्र त्यानंतर येथील कंत्राटदाराने काम सुरू करण्याच्या नावावर फक्त वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ढिगारे रस्त्यावर टाकलेले आहे.. यामुळे दररोज एक ना अनेक वाहन चालकांचे अपघात सदर रस्त्यावर होत आहे असे कळते
ह्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत परिसरातील व्यावसायिकांनी घाटंजी नगर परिषदेला निवेदन देऊन तातडीने आवश्यक ते निर्देश संबंधितांना देण्याची मागणी केलेली आहे.
0 comments:
Post a Comment