वरोरा सादिक थैम :-वरोरा शहरात किरायाने राहणारे न्यायाधीश बाहेर गावी गेले असता घरात कुणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेत न्यायाधीशांचे घर फोडले घरातून सोने चांदी रोख असा हजारो रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
The thieves broke into the judge's house and stole gold, silver and cash
सीनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी. आर. पठाण हे देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील ओम शांती नगरातील चंद्रकांत पुसदकर यांच्या घरी मागील काही महिन्यापासून किरायाने राहत आहे. काही दिवसापूर्वीच ते बाहेर गावी गेले होते. २३ मे च्या रात्री चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे बघत घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी घरातील बारा ग्राम सोन्याची चैन दहा हजार रोख सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरी गेले. २४ मेला सकाळी घरमालक पहिल्या मजल्यावर गेले असता चोरी झाल्याचे दिसून आले.
याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले. श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणाहून १०० ते १५० मीटर गेल्यानंतर परत आले. घटनास्थळावर जिल्हा गुन्हे शोध पथक दाखल झाले. सदर घटनेचा तपास वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
0 comments:
Post a Comment