राजुरा :-बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलीच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत चोरयांचे सत्र सुरू असतानाच MH 40 CT 0870 बोलेरो चारचाकी वाहणातून वेकोली च्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीतून दोन टन लोखंडी भंगार नेताना सुरक्षा रक्षकाने पकडले व राजुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी अक्षय पहानपटे (२६) राहणार राजीव गांधी चौक राजुरा यांच्यावर भादवी कलम 379 अन्वये राजुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Stealing session continues at Dhopatala open pit coal mine in WCL.
पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप निरीक्षक पांडुरंग डी. हाके, सुनील गौरकार, किशोर तुमराम, तिरुपती जाधव, योगेश पिदूरकर, महेश बोलगोडवार , रामा बिंगेवाड सह राजुरा पोलीस पुढील तपास सुरू आहे. वेकोली व्यवस्थापक यांच्या प्रवासाकरिता असलेल्या या बोलेरो गाडीतून भंगार चोरी सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या चोरीवरून मागील काही चोरयांचे धागे हाती लागतील का याचा तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment