घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
घाटंजी तालुक्यातील शेवटच्या टोकावर येणाऱ्या सायफळ येथून पैनगंगा नदीवर सुरू असलेल्या बंधा-याच्या कामासाठी उच्चदाब विद्युत पुरवठ्याचे खांब टाकण्याचे काम सुरू असून सदर विद्युत खांब रस्त्याच्या अगदी जवळच टाकल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सदर विद्युत खांब सार्वजनीक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याच्या अगदी जवळ उभे केलेले खांब काढून टाकावे अशी मागणी जनतेतून होत आहे
सदर विद्युत खांब न हटवल्यास वाहने बाजुला घेतांना विद्युत खांबाला धडकल्यास मोठा अपघात होऊ शकतो यामुळे बांधकाम विभागाने लक्ष देऊन सदर विद्युत खांब हटवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Danger of accident by erecting electric pole near the road
सायफळ ते उनकेश्वर रोडवर सदर विद्युत खांबे उभे करण्यात येत असून हा मार्ग राज्य मार्ग असून तेलंगाना मराठवाडय़ात जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्याने वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच हा रस्ता एकेरी असल्याने वाहने बाजुला घेतांना मोठी कसरत करावी लागते त्यामध्येच रस्त्याच्या अगदी काठालाच विद्युत खांबे उभे केल्याने वाहने बाजुला घेतांना वाहन त्या विधुत खांबाला धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे वेळीच सार्वजनीक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सदर विद्युत खांबे हटवतील का याकडे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment