भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-शहर तथा तालुक्यात अवैध रेती तस्करीला मोठे उधान आले असून आता चारगाव अहेरी घाट रेती घाटावरून सुद्धा रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची मोठी तस्करी होत आहे मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
वेकोलीच्या एकता नगर वसाहतीलगत चारगाव रस्ता जातो हा रस्ता नदीपर्यंत जात असल्यामुळे या घाटाकडे अवैध रेतीमाफि यांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. या घाटावरून रोज-रात्रोला मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर द्वारे रेतीची तस्करी केल्या जाते. या अवैध रेती तस्करीमुळे महसूल विभागाचे कोट्यवधीची रुपयाचे नुकसान होत आहे .रेती तस्कर मात्र या गोरख धंद्यातून अमाप पैसा कमवीत आहे. या नदी घाटावरून होत असलेले नियमित रेती तस्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही? हा प्रश्न सर्वसाधारन नागरिकांना पडला आहे. ग्रामीण परिसरात त्या भागातील रेती तस्करावर अनेकदा कारवाया करण्यात आल्या मात्र या घाटावरून अवैध रेती तस्करी करणाऱ्या शहरातील रेती तस्करावर का कारवाई होत नाही, हे एक कोडेच आहे. आता तरी या रेती तस्करी कडे महसूल विभागाचे लक्ष जाईल काय? हा प्रश्न नागरिकांतर्फे विचारण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment