Ads

प.पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांचा १८ वा.स्मृतिदिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम संपन्न.

ऊर्जानगर:-कर्मयोगी संत परमपूज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या अठराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर कार्यालयात सभासदांच्या दहावी ,बारावी उत्तीर्ण व पदवी प्राप्त पाल्यांचा सत्कार कार्यक्रम शनिवार दिनांक 8 .6. 2024 ला सामुदायिक प्रार्थनेनंतर संपन्न झाला
Reverend Tukaramdada Geetacharya's 18th commemoration day and meritorious student felicitation program concluded.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.मुरलीधर गोहने यांनी भूषविले उद्घाटक मा.दिलीप वंजारी कल्याण अधिकारी सी एस टी पी एस चंद्रपूर व मार्गदर्शक मा.अजय बगमारे तुकुम ,मा. शंकर दरेकर सेवाधिकारी तसेच प्रमुख अतिथी कल्पना बगमारे, अर्चना गोहणे विचारपिठावर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करून तसेच पूजनीय तुकाराम दादा गीताचार्य यांच्या प्रतिमेला व अधिष्ठानाला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कर्मयोगी तुकारामदादा गिताचार्य यांच्या जीवनावर शंकर दरेकर यांनी विविध आठवणी व कार्यावर संक्षिप्त माहिती दिली तसेच दिलीप वंजारी व अजय बगमारे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी वर्ग १० वी चे पार्थ वैशाली मनोज चामाटे ,नयन रागिना राजेश काळमेघ,आयुष शितल दिवाकर बोबडे व वर्ग 12 वीचे हर्ष अर्चना मुरलीधर गोहने, आयुष गीता पुरुषोत्तम उगे, भाग्यश्री मुक्ता अशोक खाडे तसेच पदवी, पदवीत्तरमध्ये तन्मय रूपाली संतोष चहाणकर ,अभिषेक मुक्ता अशोक खाडे ,प्रतीक रूपाली संतोष चहानकर, सुशील नलू रामदास तुमसरे यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू ,पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडूभाऊ कुळमेथे यांनी केले. प्रस्तावना तन्मय चहानकर यांनी तर आभार ऋग्वेद कोंडेकर यांनी मानले.परमपूज्य तुकाराम दादा यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment