राजुरा :-राजुरा तालुक्यातील सास्ती येथील रोहन संतोष चिंतला या ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रोहनने वर्धनदीच्या सास्ती पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
Youth committed suicide by jumping into the river
रोहन शनिवारी दुपारी चार वाजता रुग्णालयातून उपचार घेऊन घरी आला. यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास रोहन सास्ती पुलावर गेला आणि उडी मारल्यानंतर त्याची दुचाकी पुलावर दिसली. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्र असल्याने रोहन सापडला नाही. रविवारी सकाळी 11 वाजता पोलिसांनी रोहनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी बल्लारपूर शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
या प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा बिशेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपानी प्रेमशहा सोयाम पोलीस हवालदार हेमराज गुरुनुले हे करत आहेत.
0 comments:
Post a Comment